ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

रायगड पोलीस दल राज्यातील बेस्ट पोलीस युनिट अवॉर्ड विजेता

नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस व सम्यक सामाजिक संस्था बेणसे यांनी केले अभिनंदन!

बेणसे (चंद्रकांत अडसुळे) : रायगड जिल्हा पोलीसांनी संपूर्ण जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था चोख ठेवली असल्याने गुन्हेगारी नियंत्रण, पोलिसांचे जनतेशी असलेला सुसंवाद या कारणांमुळे रायगड पोलीस दल हे महाराष्ट्र राज्यात अव्वल ठरले आहे. रायगड जिल्ह्याला मिळालेल्या या पुरस्कारामुळे रायगडचे नाव महाराष्ट्र राज्यात उंचावले आहे. हा बहुमान माझ्या माझ्या पोलीस बांधव व पोलीस भगिनी यांच्या प्रामाणिक कामगिरीमुळे मिळाला आहे. त्यामुळे रायगड पोलीस दलातील पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे अलिबाग पोलीस मुख्यालयातील श्री. जगदीश काकडे पोलीस उपअधीक्षक (गृह) रायगड अलिबाग, हर्षकांत पवार (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक) यांचे नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस व सम्यक कला, क्रिडा, शैक्षणिक व सामाजिक संस्था - बेणसे, ता. पेण, जि. रायगड यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. या प्रसंगी सम्यकचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत पांडुरंग अडसुळे, सचिव प्रमोद दयानंद काकडे, बेणसे ग्रामपंचायत उपसरपंच संतोष पांडुरंग अडसुळे, कमळ नागरी पतसंस्थेत उपाध्यक्ष संतोष पुरो, सदस्य विशाल अशोक  अभंगे, आदिनाथ अडसुळे, अमित अडसुळे, ज्ञानेश्वर कोळी, बाळा वाघमारे, विजय अडसुळे आदि मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog