ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

लाईट ऑफ लाईट संस्थेच्या माध्यमातून ज्ञानदीप विद्यामंदीर साई येथे मार्गदर्शन शिबीर

साई/माणगांव (हरेश मोरे) : माणगांव तालुक्यातील लोकमान्य ज्ञानदीप विद्यामंदिर साई येथे लाईट ऑफ लाईट संस्थेेच्या वतीने 23 ऑक्टोबर रोजी मार्गदर्शन शिबीर आयोजित केले होते. त्यावेळी माणगांव येथील रायगड भूषण प्राप्त ज्येष्ठ पत्रकार अरुण पवार यांना विध्यार्थ्यांना पत्रकारितेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

यावेळी लोकमान्य ज्ञानदीप विद्यामंदिर या विद्यालयाचे अध्यक्ष गजानन अधिकारी, लाईट ऑफ लाईट माणगांव संस्थेचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी उल्हास सावंत, सामाजिक कार्यकर्त्यां गीता गावडे, शिक्षक स्मिता काटू, तसेच लोकमान्य ज्ञानदीप विद्यामंदिर येथील शिक्षक, शिक्षककेत्तर कर्मचारी व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी अरुण पवार यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, जीवन ही एक स्पर्धा आहे. या स्पर्धेत टिकून राहायच असेल तर वाचन व अभ्यास करणे महत्वाचे आहे. त्यावेळी उल्हास सावंत यांनी त्यांच्या जीवनातील पत्रकारितेतील अनुभव अविस्मरणीय क्षण विचारले असता त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले आपण जरी सर्व सामान्य कुटुंबातील असलो तरी खचून न जाता येणाऱ्या संकटाणा सामोरे गेले पाहिजे. तुमच्या जीवनात अनेक संकट येतील त्यावर मात करण्यासाठी अभ्यास व वाचन असणे आवश्यक आहे.

यावेळी त्यांच्या जीवनात आलेले प्रसंग विद्यार्थ्यांना सांगितले व पत्रकार हा देशाचा चौथा आधारस्थंभ असून अनेक लोकांना या पत्रकारितेतून न्याय देता येतो व त्यांच्या समस्या सोडवता येतात अशा प्रकारचे कार्य माझ्याकडून झाले आहे असे सांगून माझे आधारस्थंभ हे स्वर्गीय आमदार अशोकदादा साबळे असून त्यांच्यापासून मला प्रेरणा मिळत गेली व पुढील जीवन प्रवास सुखद चालला आहे असेही ते शेवटी म्हणाले.


Comments

Popular posts from this blog