मुख्य संपादक : किशोर केणी   |   सहसंपादक : दिनेश चांगू मोरे   |   सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी प्रक्रिया आता गतिमान! सिटीझन पोर्टल'द्वारे ऑनलाइन अर्ज करावेत : रायगड पोलिसांचे आवाहन 🚨

निराधार महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी पितळे परिवाराकडून दहा शिलाई मशीनची मदत

खारपाडा (सुरेश तांडेल) : स्वर्गीय दीनानाथ पितळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोकण कट्टा विलेपार्ले या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक अजित पितळे, आकांक्षा पितळे आणि त्यांच्या परिवाराकडून पनवेल तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागात निराधार बालके व आर्थिक दृष्ट्या कमकुवत घटकांसाठी काम करणाऱ्या ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेला १० शिलाई मशीन देणगी स्वरूपात देण्यात आल्या. 

ग्राम संवर्धनच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात कोकण कट्टा चे सचिव सुजित कदम, विवेक वैद्य, मंगेश राणे, संतोष कदम, सागर मालप, मनीष माईन, समीर देसाई, जगन्नाथ गावडे, दयानंद मांडवकर, श्री. प्रशांत भोईर, विनोद आचरेकर, प्रभाकर सांडम आणि प्रशांत पाटील यांनी ग्राम संवर्धनचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, प्रकल्प समन्वयक उदय गावंड,जयेश शिंदे शैलेश कोंडसकर, बालग्राम मित्र रणजीत पाटील आणि राजू पाटील यांच्या उपस्थित बालग्रामच्या महिला पालकांकडे सदर शिलाई मशीन सुपूर्द करताना अजित पितळे यांनी सांगितले की, ह्या मशीनच्या माध्यमातून कापडी पिशव्यापासून व इतर विविध कापडी वस्तू किंवा शोभिवंत वस्तू बनविल्यास त्या मुंबईसारख्या बाजारपेठेत विकण्यास कोकण कट्टा सदैव प्रयत्न करेल.

Comments

Popular posts from this blog