मुख्य संपादक : किशोर केणी   |   सहसंपादक : दिनेश चांगू मोरे   |   सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 पश्चिम बंगालमधील गोळीबार आणि बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह तिघांना मुंबई गुन्हे शाखेकडून अटक.! 🚨

बौद्ध धम्म समितीचे संस्थापक पंकज तांबे यांनी आनंदराज आंबेडकर यांची घेतली सदिच्छा भेट

साई/माणगांव (हरेश मोरे) : माणगांव तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक शैक्षणिक या क्षेत्रात तन मन धन लावून काम करत असलेले युवा कार्यकर्ते तसेच बौद्ध धम्म समितीचे संस्थापक तथा अध्यक्ष पंकज तांबे यांनी १४ ऑक्टोबर रोजी दादर आंबेडकर भवन येथे कार्यकर्त्यांन समवेत विश्व रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तसेच रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांची सदिच्छा भेट घेतली.

त्यावेळी पंकज तांबे सोबत बौद्ध धम्म समिती उपाध्यक्ष स्वप्नील शिर्के, सेक्रेटरी संभाजी गायकवाड, पत्रकार गौतम जाधव उपस्थित होते. बौद्ध धम्म समितीची ६ ऑक्टोबर रोजी पंकज तांबे यांनी स्थापना केली असून पुढील वाटचालीस आनंदराज आंबेडकर यांच्या कडून शुभेच्छा व आशीर्वाद मिळावा याकरिता ही  भेट घेण्यात आली. त्यावेळी आनंदराज आंबेडकर यांनी या भेटी दरम्यान या समिती बाबत योग्य असे मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी पंकज तांबे यांनी या समितीची आनंदराज आंबेडकर यांना ध्येय धोरण व प्रमुख उद्धीष्ट कोणती आहेत हे सांगितले.या एक तासाच्या भेटी दरम्यान यावेळी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. शेवटी पंकज तांबे व त्यांच्या सोबत आलेल्या कार्यकर्ते यांना आनंदराज आंबेडकर यांनी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog