माणगांव, इंदापुर विभागात विटांचा मोठा तुटवडा बांधकामे रखडली
साई/माणगांव : हरेश मोरे
माणगांव तसेच इंदापुर परिसरात तीस ते चाळीस विटभट्ट्या व्यवसायीक असून या विटभट्टीवर नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यातच विटा बांधकामासाठी शिल्लक नसून माणगांव तसेच इंदापुर परिसरातील अनेक बांधकामे अर्धवट राहून रखडली असून अवकाळी पाऊस पडल्याने विटभट्टीचे मालक देखील हवालदिल झाले आहेत.
२०२१ मध्ये जानेवारी, फेब्रुवारी मध्ये अवकाळी पाऊस पडल्यामुळे नवीन काढलेल्या विटभट्टी मालाचे मोठे नुकसान सर्वत्र माणगांव तालुक्यातील विटभट्टी मालकांना झाले होते. फार कमी प्रमाणात विटभट्ट्या माल निघाला असल्यामुळे यावेळी २०२२ फेब्रुवारी महिन्या पर्यंत माणगांव, इंदापुर परिसराती बांधकामांना विटांचा तुटवडा होऊ शकतो असे माणगांव इंदापुर परिसरातील विटभट्टी मालक अध्यक्ष विलास शिंदे तसेच भारत डिघे यानी बोलताना सांगितले. त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साचल्याने नवीन विटभट्या तयार करता येत नसून आमचे खूप मोठे नुकसान झाले आहे. तसेच विटभट्ट्यांवर काम करणाऱ्या मजूरांची देखील काम नसल्याने उपास मारीची वेळ आली आहे. तसेच विटा कुठेही भेटत नसल्यामुळे बांधकामे मोठ्या प्रमाणात रखडल्याने गवंडी, बिगारी यांना देखील मजूरी मिळेनाशी झाली आहे. इंदापुर परिसरातील विटेला मुंबई पुणे येथून दरवर्षी मोठ्या प्रमाणात मागणी होत असून या वर्षी माञ अवकाळी पावसामुळे विटभट्टी मालक पूर्णपणे हवालदिल झाले आहेत.
Comments
Post a Comment