ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

पंकज तांबे यांनी आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षा शिबीराचे सर्व स्तरांतून कौतुक व जिल्ह्यात समाधानकारक चर्चा  

साई/माणगांव : हरेश मोरे

महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक मध्ये बौद्ध धम्म सामाजिक संस्था माणगांव या संस्थेचे अध्यक्ष पंकज तांबे यांच्या माध्यमातून संस्थेच्या वतीने तसेच बार्टी च्या माध्यमातून रविवार दि.१९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. यूपी.एस.सी, एम.पी.एस.सी, आय बी पी एस,या स्पर्धा परीक्षा बाबत महाड, पोलादपूर, माणगांव या तालुक्यातील विद्यार्थी व विद्यार्थिनीसाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित केले होते. या मार्गदर्शनासाठी एकूण  ८०० विद्यार्थी उपस्थित होते.तसेच एस टी बससेवा बंद असताना देखील खेडोपाड्यातून दुर्गम भागातून सकाळी १० वाजताच विद्यार्थी हजर झाले होते तसेच विद्यार्थी सोबत प्राचार्य सुद्धा उपस्थित होते.प्रमुख मार्गदर्शक यांनी स्पर्धा परीक्षा बाबत उपस्थित विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले.

रायगड जिल्ह्यात महाड येथे युवा उद्योजक पकंज तांबे यांनी बौध्द धम्म सामाजिक संस्थेच्या माध्यमातून प्रथमच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये व पालक वर्ग तसेच शिक्षक वर्गात मोठे  उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केल्यामुळे अनेक शिक्षक, पालक,, विद्यार्थी यांनी पंकज तांबे यांचे फोन व्दारे तथा भेटून अभिनंदन केले असून मार्गदर्शन शिबिरात मोठया संख्येने विद्यार्थी उपस्थित होते त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन प्रत्येक तालुक्यात असेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात येणार आहेत असे तांबे यांच्याशी प्रतिनिधीनी संपर्क केला असता त्यांनी सांगितले असून महाड मध्ये झालेल्या स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबिराची चर्चा मात्र सर्वत्र महाड तालुक्यात रायगड जिल्ह्यात होताना दिसत आहे.

Comments

Popular posts from this blog