कामगारांचे प्रश्न कंपनी प्रशासन सोडवत नसल्यामुळे कंटाळून अखेर कामगारांचा युनियनकडे जाण्याचे निर्णय
माणगांव : सचिन पवार
विळे भागाड एमआयडीसी येथील पोस्को महाराष्ट्र स्टील मधील EG टेक चे कामगार सुबोध ठाकूर, प्रणित म्हामूनकर, प्रणिल नलावडे, सुनील शिंदे, प्रशांत सावंत, विवेक शिंदे, विशाल हरणे, रूपेश जाधव, निकुल पोळेकर, जगदीश पाशीलकर, एकनाथ जांभरे यांना सस्पेंशन लेटर देऊन शिव्या देत कामावरून निलंबित करण्यात आले आहे यांनी दि. १३/१०/२०२१ रोजी विविध मागण्यांचे निवेदन कंपनी प्रशासनाला दिले असता त्यांच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर कामगारांनी तेच निवेदन पोस्को महाराष्ट्र स्टील या मुख्य कंपनीच्या व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांना दिले. तिकडे देखील कामगारांना न्याय मिळाला नाही. विविध प्रस्थापित राजकीय नेत्यांचे उंबरठे झिजवल्या नंतर कामगारांनी अखेर भारताचे घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्याकडे कामगारांचे बुलंद आवाज असे कामगार नेते श्री. रमेशजी जाधव यांच्या माध्यमातून कामगारांच्या मागण्यांचे निवेदन दिले असता, त्यांनी कामगारांना मोलाचे मार्गदर्शन केले व कामगारांनी लढा नव्याने उभा केला आणि वादळी वातावरणात भारतीय रिपब्लिकन कामगार सेनेची स्थापना श्री. रमेशजी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कामगारांच्या सहमताने केली. त्यांच्या माध्यमातून कामगारांना न्याय मिळणार असा त्यांना ठाम विश्वास आहे तरी नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये अध्यक्ष रुपेश मनोहर जाधव, सचिव जगदीश गोविंद पशीलकर, संघटक निकुल नामदेव पोळेकर, नवीन नियुक्ती केलेल्या पदाधिकाऱ्यांना सर्व कामगारांनकडून शुभेच्छा देण्यात आल्या. यापुढे जर कंपनीने कामगारांनी युनियन केली म्हनून कामगारांवर सूड भावनेने कार्यवाही केली तर आनंदराज आंबेडकर साहेबांच्या आदेशाने तीव्र आंदोलन उभे करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला
Comments
Post a Comment