माणगांव नवनिर्वाचित नगरसेविका सौ. शर्मिला सुर्वे यांचा वॉर्ड क्र. १३ मधून दणदणीत विजय
माणगांव : सचिन पवार
माणगाव नगरपंचायतीच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 13 मधून सर्वांच्या लाडक्या सौ. शर्मिला सुर्वे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि सर्वांचे अंदाज खोटे ठरवत अशक्य वाटणारा विजय लोकांच्या प्रेमामुळे खेचून आणला. हा विजय म्हणजे हृदयस्पर्शी सोहळा ठरला असून अनेक मातब्बर मंडळींना विचार करायला लावणारा ठरला आहे. त्याचे कारणही तसेच आहे. अनेक वर्षांपासून सातत्याने विरोधकांना कौल देणारा वॉर्ड लोकनेते स्व. अशोकदादा साबळे यांच्या आशीर्वादाने, राजीवजी साबळे यांच्या मार्गदर्शनाने, ज्ञानदेव पवार यांच्या सहकार्यामुळे,सुर्वे घराण्याच्या पुण्याईमुळे, आशीर्वादाने व मॅडमच्या स्वभावामुळे, व्यापारी मंडळीशी असणाऱ्या संपर्कामुळे, माननीय राजीवजी साबळे व ज्ञानदेव पवार यांचे हात बळकट करण्यात मॅडम यशस्वी झाल्या. राजकारणात नवीन असून सुद्धा कसं लढायचं, काय रणनिती आखाययची व कार्यकर्त्यांचा उपयोग कसा करून घ्यायचा याचं सुंदर नियोजन करून या वार्डात त्या प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या.
या विजयानंतर राजस्थान कॉलनीमध्ये स्नेहभोजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात सर्व मान्यवर व्यापारी सहभागी झाले होते केवळ सहभागीच झाले नव्हते तर स्वतःचा कार्यक्रम आहे असे समजून वावरत होते, एकमेकांची आस्थेने चौकशी करत होते.
शर्मिला सुर्वे ह्या याच वार्डात लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांचा स्वभाव सर्वांना भावला, पूर्वीपासूनच व्यापारी मंडळीशी त्यांचे अत्यंत स्नेहपूर्ण संबंध होते. त्या कधीच कोणाला दुखावल्या नाहीत आणि हाच स्वभाव सर्वांना आवडला. त्यांच्या वडिलांपासून व घराण्याच्या परंपरेनुसार सर्वांना आपलेच समजून वागण्याचा वारसा मॅडमला लाभला आणि त्याचा फायदा या निवडणुकीत त्यांना झाला. व्यापाऱ्याबरोबरच शिवाजी नगर मधील रहिवासी, जावरे कुटुंबीय व निजामपुर रोड नाक्यावरील सर्व रहिवासी यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवून खूप सहकार्य केले. मॅडम आमच्याच आहेत अशी भावना वेळोवळी प्रचारादरम्यान व्यक्त होत होती.
स्नेहभोजनाचा कार्यक्रम सर्वजण एकत्र येण्याचे एक निमित्त होतं. त्याठिकाणचे दृश्य पाहून शिवसेना नेते माननीय राजीवजी साबळे हेसुद्धा भारावून गेले. मॅडमच्या कार्याचे आणि नियोजनाचे त्यांनी कौतुक केलं. प्रत्येक व्यापारी राजीवजी यांच्याशी हितगुज करताना दिसत होता. तुम्हाला नेहमी सहकार्य करू फक्त तुम्ही आमच्या पाठीशी खंबीरपणे रहा अशा जणूकाही भावना व्यक्त करत होते. याप्रसंगी व्यापारी असोसिएशनचे संस्थापक- अध्यक्ष माननीय श्री लक्ष्मण दळवी हे शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.
वार्डातील रखडलेली कामे, रहदारीचा प्रश्न, पाण्याच्या निचऱ्याच्या प्रश्न, अंतर्गत रस्त्याचा प्रश्न, या सोबतच अनेक सोयीसुविधा करण्यासाठी मॅडम यशस्वी होतील असा ठाम विश्वास व्यक्त केला.
या वार्डातील नागरिक आमच्या मागे आता मॅडम व शिवसेना नेते राजीवजी साबळे हे आहेत त्यामुळे आमचे अनेक प्रश मार्गी लागतीलअसा विश्वास त्यांना वाटत होता. त्यांच्यासमवेत प्रसिद्ध व्यापारी रमेशशेठ जैन, घनश्याम शेठ, सुरेश गांधी,अजित दोशी,राजू पुरबिया, शांतीलाल जैन,नरेश जैन, विकी गांधी, तेजस गांधी, प्रसाद धारिया सागर गांधी, मांगीलाल कुमावत, शंकर कुमावत, ललित ओसवाल, हेमंत शेट,, संदीप मेथा, बशीरभाई समस्त व्यापारी उपस्थित होते.
या विजयात शिवसेना शाखाप्रमुख प्रशांत शेंडगे, विद्यानगर सोसायटी सेक्रटरी राजेंद्र सुर्वे, समाजसेवक तसेच कट्टर शिवसैनिक सचिन मनोहर देसाई, निलेश चव्हाण, माजी शिवसेना तालुका प्रमुख बाळशेट घोणे, संजीव जुईकर, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक मोहिते साहेब, काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष सुनीलदत्त चव्हाण, साबळे विद्यालयाचे सर्व कर्मचारी, रामदास जावरे, ऋषिकेश जावरे, तसेच सर्व शिवसैनिक यांनी विशेष मेहनत घेतले.
Comments
Post a Comment