ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

माणगांव शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

माणगांव : सचिन पवार

जगभरात कोरोना व्हायरसचा नवा व्हेरियट ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत आहे. संपूर्ण देशात ओमायक्रोन रुग्ण सापडत असल्याने रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यात माणगांव शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने १५ ते १८ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सीन लसीकरण करण्यात आले. यावेळी उपस्थित असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. १६ जानेवारी २०२१ पासून देशात लसीकरणाला सुरुवात झाली.  

रायगड जिल्ह्यातील ९४.३९ टक्के लाभार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेतला असून  यापैकी ६७.९४ टक्के लाभार्थ्यांनी लसीचे दोन घेतले आहेत. मात्र सध्या जगात वाढत असलेले कोवीड रुग्ण व आढळून येत असलेल्या ओमायक्रोन व्हेरियंटच्या रूग्णांमुळे सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीकरण वाढविण्यासाठी निर्देश दिले आहेत. ३ जानेवारी 2022 पासून १५ ते १८ वयोगटातील मुलांना कोविड १९ लसीकरण सुरु करावे व त्याच्या लसीकरणासाठी केवळ कोव्हॅक्सीन लसीचा वापर करावा. हेल्थ केअर वर्कर व फ्रंटलाइन वर्कर यांनी दोन्ही डोस घेतले असतील त्यांनी १० जानेवारी 2022 पासून प्रिकोशन डोस घेण्यात यावा प्रिकोशन डोस देताना संबोधित लाभार्थ्यांना दुसरा डोस देताना 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झालेले असावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. 

माणगांव शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने झालेल्या कोव्हॅक्सीन लसीकरणाचा फायदा आज 15 ते 18 वयोगटातील मुलांना झाला असून मुलांनी त्यांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आहे. यावेळी माणगांव शिक्षण प्रसारक मंडळाचे माणगांव ज्युनिअर कॉलेज चे प्रिंसिपल टी जे. ढमाल सर, अशोकदादा साबळे विद्यालयाचे व्हॉइस प्रिंसिपल डी एम जाधव सर, गणेश यशवंत वाघरे च्या प्रिन्सिपल सौ. मनीषा मोरे मॅडम तसेच उभारे सर, म्हस्के सर, पुराणीक मॅडम, टोळके मॅडम, अनघा जाधव मॅडम, सुर्वे सर, हेमंत सेंट आणि  प्राथमिक आरोग्य केंद्र निजामपूर वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशीम भारसखले सुपरवायझर महेश पाटील, स्टाफ नर्स मनीषा पानसरे, आरोग्यसेविका सीमा कोडविलकर, आरोग्य सेवक सुनील मोरे मदतनीस समीक्षा पारखे याच्या संयुक्ताने कोविड 19 लसीकरण 2022 वयोगट 15 ते 18 लाभार्थ्यांचे लसीकरण मंगळवार दिनांक 4 जानेवारी 2022 रोजी पहिल्या टप्प्यात 300 डोस पूर्ण झाले.

Comments

Popular posts from this blog