मुख्य संपादक : किशोर केणी   |   सहसंपादक : दिनेश चांगू मोरे   |   सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी प्रक्रिया आता गतिमान! सिटीझन पोर्टल'द्वारे ऑनलाइन अर्ज करावेत : रायगड पोलिसांचे आवाहन 🚨

बाळसई येथे शिवजयंती उत्साहात साजरी

बाल शिवाजी महाराजांची घोड्यावरून काढली मिरवणूक

नागोठणे : महेंद्र माने

रोहा तालुक्यातील बाळसई येथे शनिवार 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची 392 वी जयंती मोठ्या उत्साहात बाल शिवाजी महाराजांची घोड्यावरून मिरवणूक काढून तसेच विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात आली.

बाळसई येथील श्री बेळजाई मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आलेल्या शिवजयंतीमध्ये शनिवारी सकाळी रायगड मधून आणलेल्या शिवज्योतीचे व सिंहासनाधीश्वर शिवपुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजाअर्चा करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. दुपारी ठेवण्यात आलेल्या हळदी कुंकु कार्यक्रमामध्ये बहुसंख्ये महिला भगिनींनी भाग घेतला. सायंकाळी संपूर्ण गावामध्ये वाजत गाजत ढोल ताश्यांच्या गजरात शिवाजी महाराज की जय,जय शिवाजी- जय भवानी,हर हर महादेव च्या जयजयकारात घोड्यावर बसलेल्या बाल शिवाजी महाराजांची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे बाल शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा आधिराज सचिन भोसले व नववारी साडी नेसलेल्या लहान मुली आकर्षण ठरल्या. मिरवणुकीनंतर रात्री सहभोजनांनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता गावातील तरुणांसह श्री बेळजाई मित्र मंडळ,ग्रामस्थ व महिला मंडळ यांनी अपार मेहनत घेतल्याची माहिती सचिन भोसले यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog