ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

अनेक वर्षाने कुडा बुध्द लेणी विकासाच्या दिशेने, दारे खिडक्यांनी झाली बंदिस्त - प्रशांत माळी

वावेदिवाळी/इंदापुर : गौतम जाधव

भारतीय पुरातत्व विभागाच्या मुंबई मंडळाच्या जंजिरा सब सर्कल च्या अधिपत्याखाली असलेली रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यात असलेल्या कुडा बुद्ध लेणी वर पुरातत्व विभागाचे जंजिरा सब सर्कल चे अधिकारी येलीकर सर यांच्या प्रयत्नातून व भारतीय बौद्ध महासभा तळा तालुका, समता सैनिक दल.यांच्या सहकार्यामुळे, गेल्या काही वर्षाच्या पाठ पुराव्या नंतर  तळा तालुक्यातील कुडा बुध्द लेणी साठी शासनाने दरवाजे आणि गेट मंजूर करून कामाला सुरुवात केली आहे.त्या बद्दल भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांचे बौध्द समाज बाधावांकडून स्वागत केले जातआहे. कुडा लेणी ही गेल्या अनेक वर्षे दुर्लक्षित अवस्थेतून होती. परंतु यावर्षी किमान दरवाजे आणि गेट बसल्याने लेणी वर होणारे अश्लील चाले या निमित्ताने बंद होतील कुडा लेणी सोबत शेलारवाडी बुद्ध लेणी वर हि कामे सुरु झाली असून लेणी वरील कामे टप्प्या टप्प्याने सुरु आहेत. नालासोपारा  बुद्ध स्तूपाचे काम सुरु आहे. सोबत सात लेण्यांवर पुरातत्व  विभागाचे काम सुरु आहे. खास करून कुडा बुद्ध लेणीला दरवाजे आणि गेट बसावा हि मागणी पुरातत्व विभागाने मंजूर केले आहे तसेच मुंबई मंडळाचे संबंधित अधिकारी आणि भारतीय पुरातत्व खात्या अर्तगत बुद्ध लेण्यांच्या संवर्धनासाठी काम होत जावे यासाठी वारंवार पाठपुरावा करणे अपेक्षित आहे. गेली तीन ते चार वर्षात ह्या लेणीच्या कामाला आलेली गती पाहता येणार  असून भविष्यात हे काम अजून जोमाने वाढणारे आहे. 

येणाऱ्या काळात या लेणीचे ऐतिहासिकत्व जपले जाईल आणि हा इतिहास पुढच्या पिढीकडे संवर्धित केला जाईल. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे कमांडर इन चीफ तसेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु भीमराव आंबेडकर यांच्या पाठिंब्यामुळे आज लेणी विषयक कामांची गती वाढत आहे. त्यांच्या प्रत्यक्ष सहकार्यामुळे आज लेणी वर कामे वाढू लागली आहेत तसेच समता सैनिक दलामध्ये लेणी संवर्धक टीमला सामावून घेवून भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून लेणी संवर्धन चळवळीला बळ देत आहेत ए.बी.सी.पी.आर लेणी संवर्धक टीम तसेच समता सैनिक दल प्रमुख प्रशांत माळी यांनी शेवटी बोलताना सांगितले.

Comments

Popular posts from this blog