मुख्य संपादक : किशोर केणी   |   सहसंपादक : दिनेश चांगू मोरे   |   सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 पश्चिम बंगालमधील गोळीबार आणि बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह तिघांना मुंबई गुन्हे शाखेकडून अटक.! 🚨

पाणसई  येथे नॅशनल कॉलेजद्वारे विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप 

वावेदिवाळी/इंदापुर : गौतम जाधव

माणगांव तालुक्यातील पाणसई येथे आर. डी एस. एच नॅशनल कॉलेज बांद्रा यांच्या माध्यमातून  तळाशेत  केंद्रा अंतर्गत असणाऱ्या १५ शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य १८  फेब्रुवारी २०२२ रोजी वाटप करण्यात आले या कॉलेज एन. एस. एस चे विद्यार्थी व प्रोफेसर वर्ग हे सन २०११ पासून पाणसई गावात येवून गावाच्या हिताचे विविध प्रकारचे लोक उपयोगी उपक्रम राबवीत अाहेत. या गावासाठी पाण्याची बोअरवेल, शौचालय, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविले अशा प्रकारची कामे या कॉलेज द्वारे पाणसई गावासाठी होत आहेत. 

या कार्यक्रमासाठी मुंबई युनिव्हर्सिटीचे रजिस्टर व राष्ट्रीय सेवा योजनेचे डायरेक्टर प्रो. सुधीर पुराणिक, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विजेंद्र शेखावत, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रॉ. साहीर मंसुरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रॉ. सुधीर पुराणिक यांनी विद्यार्थ्यांनजवळ संवाद साधला व मार्गदर्शन करताना सांगितले की, जीवनात सफल व्हायचे असेल तर भरपूर अभ्यास करून यश प्राप्त केले पाहिजे. त्यासाठी आतापासूनच तुम्हाला प्रयत्न करणे गरजेचे आहे.या कार्यक्रमासाठी पाणसई गावातील अँड. परेश जाधव, माजी सरपंच विलास शिंदे, सामाजिक कार्यकर्ते संतोष मोरे, तळाशेत केंद्रप्रमुख गणेश ढेपे, सर्व शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog