ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

वावेदिवाळी काळीका देवीच्या मंदिराचे भूमीपुजन खा. सुनिल तटकरे, ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न

बौद्ध व आदिवासी बांधवाना डावलल्याने नाराजी  

वावेदिवाळी/इंदापूर : गौतम जाधव

मागील अनेक वर्षांपासून प्राचीन काळातील असणारे वावेदिवाळी येथील श्री काळीका देवी मंदिराचे भूमी पुजन हे शनिवार  दि.२६ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री ८.०० वा रायगडचे खासदार सुनीलजी तटकरे तसेच रायगडच्या पालकमंत्री ना.आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या आमदार फंडाच्या निधीतून १० लाख रूपये, तसेच कोकण पर्यटनच्या अंतर्गत १५ लाख रूपये निधी असा २५ लाख रूपयांचा निधी हा वावेदिवाळी येथील श्री काळीका देवी मंदिर कामासाठी देण्यात आला आहे. तसेच श्री काळीका देवी मंदिर बांधकाम कमिटीवर तीन आदिवासी वाड्यांमधील सदस्य तसेच एक बौद्धवाडी मधील सदस्य तसेच या वाड्यांतील ग्रामस्थ देखील या कार्यक्रमाच्या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परंतु यांचे कुठल्याही प्रकारे या भुमिपुजन कार्यक्रमात नाव न घेतल्याने त्यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्यामुळे बौद्ध व आदिवासी बांधवांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. 

तसेच या कार्यक्रमाच्या वेळी खा. सुनिल तटकरे यांनी वावेदिवाळीतील बाजीराव कदम, यशवंत कदम, वडाच्या वाडीचे कमलाकर कदम या ज्येष्ठ नेत्यांची नावे घेऊन जुन्या आठवणींना एक उजाला दिला. वावेदिवाळी श्री काळीका मातेचे मंदिर हे पुरातन असून ते अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे त्याचे काम देखील तेवढेच सुंदर झाले पाहिले जेणकरूण मुंबई वरून गोव्याला जाणारा माणूस हा देखील या मंदिरात येऊन दर्शन घेऊन गेला पाहिजे. तसेच या वर्षी वावेदिवाळी ते विनवळी महागाव कोरखांडे हा रस्ता देखील भक्कमपणे बनविला जाईलअसे देखील खा. सुनील तटकरे यांनी शेवटी बोलताना सांगितले. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र  युवक सचिव दिपक जाधव, शेखरशेठ देशमुख, इंदापुर विभाग राष्ट्रवादीचे अध्यक्ष काका नवगणे, तळाशेत ग्रामपंचायत उपसरपंच उदय अधिकारी, माणगांव प.स.सभापती आलकाताई जाधव, उद्योजक सुभाष शेठ दळवी नितिन घोणे,तसेच वावेदिवाळी, वडाचीवाडी, मोऱ्याचीवाडी, ग्रामस्थ तसेच मुंबई मंडळ, महिला मंडळ, तरूण मित्र मंडळ यावेळी मोठ्या संखेने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog