ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

आगामी जि.प. पं. स. निवडणूका भाजप स्वबळावर लढवणार, शिवसेनेशी युती नाही - आप्पाशेठ ढवळे

वावेदिवाळी/इंदापुर : गौतम जाधव

राज्यात आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या  रायगड जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका भारतीय जनता पक्ष स्व:बळावर लढवणार असून माञ माणगांव तालुक्यात जि.प. प.स.निवडणूकीत यावेळी शिवसेनेशी भाजप पक्ष युती करणार नाही असे प्रतिपादन माणगांव तालुका भाजपचे अध्यक्ष संजय (आप्पा) ढवळे यांनी प्रतिनिधी जवळ बोलताना केले असून पुढे त्यांनी बोलताना सांगितले की, राज्यात अस्तिवात असलेल्या महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमधील अंतर्गत धुसपुस व वाद हा मागील काही महिन्यांपासून रायगड जिल्ह्यात देखील दिसून येत आहे. त्याचप्रमाणे मागे झालेल्या माणगांव नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीतील एका हिंदुत्ववादी घटक पक्षाने रायगड जिल्ह्यामध्ये काही नगरपंचायतीमध्ये सोयीप्रमाणे सोयरीक साधण्याचा प्रयत्न केला व त्याचे परिणाम निकालावर व निकाल लागल्यानंतर दिसून येत आहेत.

तसेच भारतीय जनता पक्ष हा देशाच्या राजकारणातील एक राष्ट्रीय पक्ष आहे आणि देशातील जनतेने देखील भारतीय जनता पार्टीला परत एकदा स्वीकारले असून ५ राज्यातील निवडणुकांमध्ये देखील भारतीय जनता पक्षाच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात आगामी निवडणूकांमध्ये भारतीय जनता पक्ष हा स्वबळावर निवडणूक लढवणार हे आता पक्के झाले आहे. त्याचबरोबर राज्यात अस्तिवात असणाऱ्या कोणत्या स्थानिक पक्षाशी रायगडमध्ये कुठल्या मतदारसंघात आघाडी वा युती करायची? हे भाजप जिल्हा कार्यकारिणी व पक्षश्रेष्ठी ठरवतील असे त्यांनी सांगितले आहे. मात्र माणगांव तालुक्यातील नवीन रचना झालेल्या सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती गटात व गणामध्ये भारतीय जनता पार्टी मात्र स्वबळावर व पक्षाच्या भारतीय निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या पक्षचिन्ह "कमळ" निशाणीवर निवडणूक लढवणार असल्याचे देखील संजय आप्पा ढवळे यांनी शेवटी बोलताना संकेत दिले आहेत.

Comments

Popular posts from this blog