ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

आज २० मार्च दिनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडीची होण्याची शक्यता

वावेदिवाळी/इंदापुर : गौतम जाधव

२० मार्च महाड चवदार तळे सत्याग्रह या दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण देशभरातून तसेच महाराष्ट्र राज्यातून मोठ्या प्रमाणात कोकणात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून बहुजन समाज महाड क्रांती भूमित येत असतो. तसेच यावेळी होळी उत्सव आणि २० मार्च हे एकच आठवड्यात लागोपाठ उत्सव आल्यामुळे गोवा राष्ट्रीय महामार्ग पनवेल ते महाड दरम्यान वाहतूक कोंडी होण्याची फार मोठी दाट शक्यता आहे. गेल्या दोन दिवसापासून मुंबई येथून होळी या सनानिमित्त आलेले कोकणातील चाकरमानी हे मुंबई येथे जाण्यासाठी परतीच्या वाटेला २० मार्च रोजी आज लागले असून. २० मार्च मुंबई वरून कोकण महाडच्या दिशेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी हजारो लाखोच्या संख्येने भिम सैनिक हे या महामार्गावरून जाणार असून अगदि पनवेल,पेण पासून वडखळ, नागोठणे, कोलाड, इंदापूर, माणगांव, लोणेरे, महाड या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता कोकणातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या चाकरमणी तसे मुंबई वरून महाडच्या दिशेने येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांना होऊ शकते. मागील दोन वर्षे कोरोनामुळे होळी उत्सव असेल किवा २० मार्च कोणतेही कार्यक्रम झाले नाहीत. यावेळी मात्र होळी उत्सव कोकणात मोठ्या प्रमाणात साजरा झाला असून २० मार्च रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देखील यावर्षी अनेक लोक येतील. तसेच या दिनानिमित्त अनेक संघटनांच्या वतीने देखील महाड येथे प्रबोधन कार्यक्रम आयोजित केले जातात.

तसेच ही वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या वाहतूक समस्येकडे लक्ष द्यावे तसेच वाहतूक कोडी दूर करण्यासाठी या मार्गांवर असणाऱ्या पोलीस ठाणे, तसेच वाहतूक पोलीस यांना ही होणारी समस्या दूर करण्यासाठी आदेश द्यावेत असे तमाम कोकणता होळीला आलेले चाकरमणी तसेच भिम सैनीक यांनी आपल्या प्रतिक्रिया बोळताना व्यक्त केल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog