मुख्य संपादक : किशोर केणी   |   सहसंपादक : दिनेश चांगू मोरे   |   सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 पश्चिम बंगालमधील गोळीबार आणि बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह तिघांना मुंबई गुन्हे शाखेकडून अटक.! 🚨

टुटेगा भाई टुटेगा, अनिल परब का रिसॉर्ट टुटेगा और सुनिल तटकरे का नंबर आयेगा  - किरीट सोमय्या 

वावेदिवाळी/इंदापूर : गौतम जाधव

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे मुंबई येथून कोकण दौऱ्यावर येत असताना रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी स्वागत करण्यात आले. तसेच माणगांव येथे एसटी स्टॅन्ड समोरच माणगांव तालुक्यातील भाजप कार्यकर्ते यांनी देखील दुपारी १.०० वा. फटाक्यांची अतिशबाजी करून माजी खासदार किरीट सोमय्या यांचे जल्लोष मध्ये स्वागत केले.

यावेळी उपस्थित कार्यकर्ते यांना सम्बोदित करताना सांगितले कि, टुटेगा भाई टुटेगा अनिल परब का रिसॉर्ट टुटेगा और सुनिल तटकरे का भी जलदि नंबर आयेगा असे वक्तव्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोणा प्रादुर्भाव असताना २३ मार्च २०२० रोजी देशामध्ये लॉकडाऊन ची घोषणा केली त्यावेळी रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब हे मात्र महावितरण कंपनी कडे रिसॉर्ट बांधकामासाठी वीज परवानगी मागत होते. यांनी कोविडच्या काळात बेकायदेशीर बांधकाम करून दापोली समृद्रकिनारी रिसॉर्ट उभारले आहे. 

राज्याचे पर्यावरण मंत्री यांनी सुद्धा हे रिसॉर्ट अनधिकृत आहे असे सांगितले. तरी सुद्धा हे  सरकार भ्रष्टाचार करणाऱ्या मंत्र्यांना पाठीशी बाळगत आहे. हे सरकार माफिया सरकार आहे अशी सुद्धा टीका यावेळी केली. तसेच अलिबाग येथील १९ बंगले हे रश्मी ठाकरे यांच्या मालकीचे होते परंतु नवऱ्याचे मुख्यमंत्री पद जाईल म्हणून एका रात्रीत हे चोरी करून गायब करण्यात आले याबाबत सुद्धा टीका करण्यात आली. 

यावेळी भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, माणगांव तालुका भाजप अध्यक्ष संजय (अप्पा) ढवळे, हेमा मानकर, नाना महाले, चिन्मय मोने, अमित घाग, अशोक यादव, विशाळ गलांडे, अरुण पेणकर, दत्ता बोडेरे, मोहन पेणकर, राजू तेटगुरे, रामचंद्र म्हसकर, शर्मिला सत्वे, यशोधरा गोडबोले, अश्विनी यादव, दीपा नकाशे व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog