आंबेवाडी जिल्हा परिषद आयोजित शिवसेना भगव्या चषकावर नवतरुण तळाघर संघाने नाव कोरले!
रोहा : अक्षय जाधव
रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने रोहा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अशा तगड्या आंबेवाडी जिल्हा परिषद आयोजित दिनांक १ मे कामगार दिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने भगव्या चषकाचे आयोजण करण्यात आले होते. स्पर्धेत एकूण 32 संघाने सहभाग नोंदविला होता. रायगड जिल्ह्यातील 51 हजार रु. रोख रक्कम असलेली सर्वात मोठ्या कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामन्यात रोहा तालुक्यातील बलाढ्य स्वयंभू भातसई व नवतरुण तळाघर संघामध्ये कडवी झुंज पहायला मिळाली परंतु नवतरुण तळाघर संघाचे मध्य रक्षक संतोष जाईलकर व प्रशांत मोरे तसेच अष्टपैलू स्वप्नील जाईलकर, जयवंत कांबळे, ज्ञानेश्वर कळंबे यांच्या दमदार कामगिरीमुळे स्वयंभू भातसई। संघावर काहीसा सहज विजय संपादन केले आणि आंबेवाडी जिल्हा परिषद आयोजित शिवसेना भगवा चषकावर आपले नाव कोरले.
या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तर यावेळी पेण मतदारसंघाचे आमदार आमदार रवीशेठ पाटील, अलिबाग - मुरुड मतदान संघाचे आमदार महेंद्र शेठ दलवी, महाड - पोलादपूर पोलादपूर मतदार संघाचे आमदार भरत शेठ गोगावले , दक्षिण रायगड भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित दादा घाग, राजीव साबळे माणगांव शिवसेना नेते, रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे, रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, चंद्रकांत लोखंडे उप तालुका प्रमुख, सरपंच नितिन वारंगे, निलेश वारंगे, कुलदीप पवार, राजेंद्र राहुल, अमर तेलंगे, ज्ञानेश्वर खामकर, ज्येष्ठ नेते शंकरराव म्हसकर, शिवराम महाबळे, सरपंच समीर महाबळे, गणेश शिंदे, भातसई ग्रामपंचायत सरपंच गणेश हरवले त्यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते, प्रेक्षक व कबड्डी खेळाडू उपस्थित होते.
या रायगड जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेत रोहा तालुक्यातील नवतरुण तळाघर प्रथम क्रमांक पटकाविला तर द्वितीय क्रमांक स्वयंभू भातसई, तृतीय क्रमांक रायवाडी, चतुर्थ क्रमांक नवयुवक धाटाव या संघाने पटकाविली. या स्पर्धेमध्ये मालिकावीरा साठी आकर्षित असलेली स्पोर्ट सायकल नवतरुण सागर तळाघर संघाचा अष्टपैलू खेळाडू ज्ञानेश्वर कळंबे याला देण्यात आली. उत्कृष्ट पकड भातसई संघाचा तुतेश खरिवले, पब्लिक हिरो रायवाडी संघाचा कौस्तुभ लाल, उकृष्ट चढाई धाटाव संघाचा अजय मोरे याला गौरविण्यात आले. तर रायगड जिल्ह्यातील सर्वात नामवंत असे रुपेश डाकी यांनी समालोचन केले.
Comments
Post a Comment