महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष कुणाल राऊत यांचे माणगांव काँग्रेस कमिटीकडून जोरदार स्वागत
वावेदिवाळी/इंदापुर : गौतम जाधव
माणगांव येथे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशचे नवनिर्वाचित झालेले युवक अध्यक्ष कुणाल राऊत यांचे बुधवार दि ४ मे रोजी दुपारी १२.३० वा आगमन झाले असता त्यांचे माणगांव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. महाराष्ट्राचे उर्जामंञी नितीन राऊत यांचे सुपुञ कुणाल राऊत यांनी प्रसारमाध्यमाना सांगितले की, माझी महाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्ष पदी निवड झाल्यावर मी कोकणातील रायगड दौरा नियोजित केला असून रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज तसेच महाड क्रांती भूमीत जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून मी महाराष्ट्रात कामाला सुरुवात करणार असून काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी महाराष्ट्रात तळागलात जाऊन युवकांना एकत्र करण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी भारतीय युवक काँग्रेस प्रभारी प्रदीप सिंह,आनिकेत म्हाञे, भारतीय काँग्रेस युवक प्रवक्ता रूषिकेश मिरजकर, तसेच माणगांव येथील काँग्रेस कार्यलयात काँग्रेस महिला पदाधिकारी रेखाताई मिरजकर,काँग्रेस महाड पोलादपुर विधान सभा अध्यक्ष जनार्धन मानकर, रायगड जिल्हा काँग्रेस सरचिटणीस डॉ.नरेंद्र सिंह, माणगांव तालुका काँग्रेस अध्यक्ष विलास सुर्वे, निजामपूर विभागीय काँग्रेस अध्यक्ष स्वप्निल शिर्के, तसेच काँग्रेस कमिटीचे युवक पदाधिकारी यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Comments
Post a Comment