ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

पनवेल, खारघर खाडीत अवैध वाळू उपसा सुरू, महसूल विभागाचे दुर्लक्ष 

वाळू माफीयांनी महसूल विभागाला घेतलेय विकत?

खारघर परिसरात वाळू माफीया जोमात, महसूल विभाग कोमात? 

खारपाडा : सुरेश तांडेल 

रायगड़ जिल्ह्यात सध्या पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाच्या अकार्यक्षमते मुळे पनवेल तालुक्यातील अवैध धंद्याना उधाण आलेले असून या अवैध धंद्यांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ लागली आहे. दरम्यान, पनवेल तालुक्यातील खारघर खाडीत से. १ रेलवे स्टेशन च्या बाजूच्या खाडीत रेती मैफियांनी धुमाकूळ घातलेला असून, येथे या खाडीत सक्शन पंपाद्वारे वाळू उपसा सुरू असल्याची धक्का दायक माहिती उघडकीस आल्यामुळे येथील वाळू मांफियानी महसूल विभागाला विकत घेतले आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

हे वाळू माफिया या खारघर खाडीत सक्शन पंपाच्या साह्याने प्रथम बाज भरतात आणि भारती सुरू झाली कि ही बाज खाडीच्या किनाऱ्यावर आणून पुन्हा सक्शन पंपाद्वारे ही बाज किनाऱ्यावर खाली करतात. आशा प्रकारे अवैध वाळू उपसा सुरू असून वाळू माफीयांकडून महसूल विभागाला लाखो रुपयांचा हप्ता पोहचत असल्याने येथे कारवाई होत नसल्याची चर्चा सर्वत्र आहे.

Comments

Popular posts from this blog