रोहा शासकीय आश्रम शाळेत क्रीडा स्पर्धेला सुरुवात
रोहा : रविंद्र कान्हेकर
आदिवासी विकास विभागाच्या शैक्षणिक वर्ष २०२२ ते २०२३ या वर्षातील शाळास्तरावरील क्रीडा स्पर्धांना प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली १६ सप्टेंबर पासून सुरुवात झाल्या. रोहा तालुक्यातील सानेगाव आश्रम शाळेतील या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा शिक्षक रविंद्र कान्हेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मधुकर फसाळे, माध्यमिक शिक्षक संतोष सगर, सुनीता दांडेकर, नितीश म्हात्रे, योगेश धुमाळ, तेजस बलकावडे, प्रणव कदम, पी. बी. मित्तेवाड, मिथुन जोगळेकर, आलिशा म्हात्रे, विजया पाटील, शामल पाटील, शशिकांत सोनावणे आदींसह खेळाडू विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोरोनाच्या काळात दोन वर्षे विद्यार्थ्याना क्रीडा स्पर्धांना मुकावे लागले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये फार मोठी नाराजी पसरली.कोरोनाची परिस्थिती निवळली असल्या कारणाने आदिवासी खात्याने शाळास्तर, प्रकल्प स्तर, विभाग स्तर व राज्य स्तर स्पर्धाचे आयोजन केले आहे. या काळात कबड्डी, खोखो, व्हॉलीबॉल, हँडबॉल व मैदानी खेळांच्या स्पर्धाचे आयोजन सर्व स्तरावर करण्यात आले आहे.
स्पर्धेच्या उद्घाटन रवींद्र कान्हेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी क्रीडा झेंडा फडविण्यात आले, राष्ट्रगीत घेऊन क्रीडा ज्योत सभोवती गुणवंत विद्यार्थ्याच्या हस्ते फिरविण्यात आली. त्याचबरोबर स्पर्धेत यशस्वी व शिस्तबद्ध खेळ करण्यासाठी शपथ देण्यात आली. त्याचप्रमाणे संचलन घेण्यात आले. त्यामुळे शाळेचे वातावरण क्रीडामय झाले होते. सर्व विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर फार मोठे आनंद निर्माण झाला होता.
सानेगाव आश्रम शाळेने कोरोनाच्या आगोदर दोन वर्षे सतत च्याम्पियन ट्रॉफी हा प्रकल्प स्तरीय किताब पटकावला आहे. त्यामुळे आता यावर्षीही ट्रॉफी मिळविण्याच्या उद्देशाने खेळाडू विद्यार्थी मैदानात उतरले आहेत. इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यानी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे.


Comments
Post a Comment