मुख्य संपादक : किशोर केणी   |   सहसंपादक : दिनेश चांगू मोरे   |   सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी प्रक्रिया आता गतिमान! सिटीझन पोर्टल'द्वारे ऑनलाइन अर्ज करावेत : रायगड पोलिसांचे आवाहन 🚨

खारगांव कोळीवाडा येथे नवसाला पावणाऱ्या आई भवानी देवीचा नवरात्रौत्सव

खारगांव/रोहा : सतिश पाटील

रोहा तालुक्यातील खारगांव कोळीवाडा येथे नवसाला पावणारी तसेच पुरातन काळा पासून जागृत देवस्थान असलेली आई भवानी देवीचा शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा झाला. दरम्यान, संपूर्ण पंचक्रोशीतील भक्तांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घेतला.

ग्रामस्थ मंडळ खरंगाव, महिला मंडळ खारगांव, तसेच युवा मंडळ खारगांव यांच्या सहकार्याने हा नवरात्रौत्सव संपन्न झाला. यामध्ये रोज रात्री 12 वाजता आरती, नऊ दिवसांचे नऊ रंग, रोज सायंकाळी 4 ते 6 ग्रंथ वाचन, खारगांव भजन मंडळी, दांडिया प्रेमी तसेच 5 व्या दिवशी शेडसाई महिला नाच मंडळ यांनी सुद्धा आपला नृत्याविष्कार सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढविली. यामध्ये सातव्या दिवशी देवी साठी होम असतो. अशा प्रकारे मोठ्या भक्तीमय वातावरणात येथे शारदीय नवरात्रौत्सव संपन्न झाला.


Comments

Popular posts from this blog