नाम फाऊंडेशन कडून गोखले कॉलेज श्रीवर्धन साठी शैक्षणिक साहित्याची मदत बोर्ली पंचतन (मुजफ्फर अलवारे) : श्रीवर्धन येथील गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात नाम फाऊंडेशन या नामांकित सामाजिक संस्थेकडून निसर्ग वादळामूळे झालेल्या हानी मधून पूर्ववत होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक साहित्य ६ संगणक, ३ प्रिंटर, ३ प्रोजेक्टर मशीन तसेच भौतिकशास्त्र प्रयोगशाळा साहित्य महाविद्यालयास हस्तांतरित केले. हा कार्यक्रम महाविद्यालयात संपन्न झाला.यावेळी संस्थेचे शाखा सचिव प्रि. डॉ. एम. आर. मेश्राम यांनी नाम फाऊंडेशन चे संस्थापक प्रसिद्ध सिने अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर व सिने अभिनेते मकरंद अनासपुरे तसेच नामचे कोषाध्यक्ष राजीव सावंत यांचे ऋण व्यक्त केले. त्यांच्या कार्याचा गौरव केला तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीनिवास जोशी यांनी प्राप्त झालेलं साहित्य विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास कामी उपयुक्त आहे असे प्रतिपादन केले. वरील सर्व साहित्य महाविद्यालयास प्राप्त करण्यासाठी महाविद्यालय विकास समिती सदस्य नितीन सुर्वे यांनी प्रयत्न केले. संस्थेचे अध्यक्ष प्रि. एस. बी...
मुख्य संपादक : किशोर केणी |
सहसंपादक : दिनेश चांगू मोरे |
सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
Popular posts from this blog
77 व्या निरंकारी समागमाच्या सेवांचा विधिवत शुभारंभ सेवेमध्ये कोणताही भेदभाव न बाळगता ती निष्काम भावनेने करावी - सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज महाड (स्मरणिका साळुंखे) :- या जगामध्ये अनेक प्रकारचे लोक राहतात. त्यांची भाषा, वेशभूषा, आहार, जात, धर्म, संस्कृती वेगवेगळे आहे. या सगळ्या विभिन्नता असूनही आपल्या सर्वांमध्ये एक गोष्ट सारखी आहे आणि ती म्हणजे आपण सर्व मनुष्य आहोत. आपला वर्ण कोणताही असो, वेशभूषा कशीही असो, देश कोणताही असो किंवा खाणे-पिणे कसेही असो; सर्वांच्या धमण्यांमध्ये एकसारखेच रक्त वाहत आहे आणि सगळे एकसारखाच श्वास घेत आहेत. आपण सर्व परमात्म्याची लेकरं आहोत. हीच भावना अनेक संतांनी वेगवेगळ्या समयी आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या भाषेतून आपापल्या शैलीमध्ये ‘समस्त संसार, एक परिवार’ या संदेशाच्या रूपात व्यक्त केली. मागील सुमारे 95 वर्षांपासून संत निरंकारी मिशन हाच संदेश केवळ प्रेषित करत आहे इतकेच नव्हे, तर अनेक सत्संग आणि समागमांचे नियमितपणे आयोजन करुन या संदेशाचे जीवंत उदाहरण प्रस्तुत करत आहे. मिशनचे लक्षावधी भक्त यावर्षीही 16, 17 आणि 18 नोव्हेंबर, 2024 रोजी संत निरंकारी आध्यात...
_0.jpg)
_1.jpg)
Comments
Post a Comment