रायगड जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना आधार प्रमाणीकरण ई-केवायसी अनिवार्य रायगड (प्रतिनिधी) :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकानांमधून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करण्यात येते. या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण ई-केवायसी (e-kyc) करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत.त्यानुसार सर्व शिधापत्रिकाधारकांनी आधार प्रमाणीकरण ई-केवायसी करून घ्यावी असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे यांनी केले आहे. लाभार्थ्यांचे ई-केवायसी (e-kyc) करण्यार्कारता गावोगावी कॅम्प आयोजीत केले आहे. या करिता शिधापत्रिकेतील अर्थात कुटुंबातील सर्व लाभाथ्यांनी आपल्या नजीकच्या रास्तभाव धान्य दुकानांमध्ये प्रत्यक्ष आधार कार्ड दाखवून, अंगठ्याचा ठसा देऊन आधार प्रमाणीकरण ई-केवायसी (e-kyc) करावयाचे आहे. सदरील प्रक्रिया दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत करावयाची असल्याने लाभार्थ्यांनी जवळच्या रास्तभाव धान्य दुकानामध्ये अथवा कॅम्पमध्ये जाऊन आपल्या अंगठयाचा ठसा व आधार नंबर देऊन ई-केवायसो (e-kyc) करावी. ई-केवायसी (c-kyc) केले नाही, तर दिनांक १५ फेब्र...
ब्रेकिंग न्यूज
Popular posts from this blog
धाटाव एमआयडीसी येथील हॉयबाख कंपनीला भीषण आग रोहा (प्रतिनिधी) :- नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी धाटाव एमआयडीसीतील हॉयबाख कंपनीतील गोदामाला बुधवारी रात्री आठ वाजता भीषण आग लागली. साधारण दिड तास आगीचे तांडव सुरू होते. यावेळी साधारण १०० कामगार कंपनीत काम करत होते. तातडीने रोहा नगर परिषद आणि एमआयडीसी अग्निशमन दलाचे चार बंब आगीच्या ठिकाणी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी कामगारांच्या सहकार्याने आग आटोक्यात आणली. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट नाही. हॉयबाख कंपनी कापड, प्लास्टिक, छपाई आणि कृषी रसायन क्षेत्रासाठी रंगद्रव्ये आणि रंग तयार करते. दरम्यान, गोदामाला लागलेल्या भीषण आगीत कंपनीची मोठी वित्तहानी झाल्याची माहिती आहे. कारखाना निरीक्षकाचा अंकुश नसल्याने धाटाव एमआयडीसीतील अपघाताच्या घटना सुरूच आहेत. सप्टेंबर महिन्यात साधना कंपनीत झालेल्या स्फोटात चार तरुण कामगारांनी जीव गमावला. मात्र कामगारांच्या सुरक्षेला प्राधान्य देणारी कंपनी म्हणून ख्याती असलेल्या हॉयबाख कंपनीच्या गोदामाला आग लागल्याने धाटाव एमआयडीसीत कोणीही सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले. ह्या...

Comments
Post a Comment