पनवेल, नवी मुंबई परिसरात लेडीज डान्सबारमध्ये रात्री उशीरापर्यंत धिंगाणा, अनेक ठिकाणी वेश्या व्यवसाय
नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी पोलीस दलाची अब्रू वेशीवर टांगली? - अॅड. काशिनाथ ठाकूर
नवी मुंबई (प्रतिनिधी) :- पनवेल आणि नवी मुंबईच्या हद्दीतील लेडीज डान्स बारमध्ये रात्री उशीरापर्यंत धिंगाणा आणि अनेक डान्स बारमध्ये वेश्या व्यवसाय तेजीत सुरू असून या परिसरात येथे तर किळसवाण्या प्रकारांनी कळस गाठलेला असून या परिसरात नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी या सर्व प्रकारांना पाठबळ देऊन पोलीस दलाची अब्रू वेशीवर टांगल्याची प्रतिक्रीया प्रहार जनशक्ती पक्षाचे सरचिटणीस अॅड. काशिनाथ ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.
पनवेल येथील जगदंबा बार, चाणक्य बार, कपल बार, क्रेझी बॉईज बार, ग्रिट्स बार, कोनगाव येथील टायटन, नाईट रायडर बार, चांदनी बार, मूननाईट बार, स्वामी बार, माया बार, बिनधास्त बार, आयकॉन बार, बाँबे बार, कळंबोली येथील तानसा बार, कॅप्टन बार, तळोजा येथील चंद्रविलास बार, तसेच कमल पंजाब अँड महाराष्ट्र बार, निसर्ग बार, कोन येथील नटराज बार (व्ही.आय.पी. रूममध्ये वेश्या व्यवसाय), साई दर्शन बार (पहिल्या मजल्यावर वेश्या व्यवसाय), वेल्वेट बार (रात्री उशीरापर्यंत वेश्या व्यवसाय), कोपरखैरणे येथील बेला बार, सावली बार, रबाळे एम.आय.डी.सी. येथील संगम बार, मूड बार, सेल्फी बार, मायरा बार, विटावा बार, सूरसंगीत बार, वाशी येथील कपील बार, MH 43 बार किंग्ज बार, रमेश बार यांसारख्या अनेक लेडीज डान्स बारमध्ये धिंगाणा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला असून पनवेल तालुक्यातील कोन गावच्या हद्दीतील राहूल पार्क हॉटेलमध्ये तर खुलेआम वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा किळसवाणा प्रकार उघडकीस आलेला आहे.
या बेकायदा प्रकारांना पायबंद कोण घालणार? असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. येथील सर्वच डान्सबारमध्ये धांगडधिंगा सुरू असल्यामुळे याठिकाणी आंबटशौकीनांची मोठी गर्दी होताना दिसत असते. या परिसरात अनैतिक प्रकारांना उधाण आलेले असून येथे डान्स बार च्या नावाखाली मध्यरात्रीपर्यंत धिंगाणा सुरू असतो; तर काही बारमध्ये रात्रभर हुक्का सुरू असतो. इतकी भयानक परिस्थिती असताना पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी या बेकायदा प्रकारांना पाठबळ देऊन पोलीस दलाची अब्रू वेशीवर टांगल्याची प्रतिक्रीया अॅड. काशिनाथ ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.
Comments
Post a Comment