मुख्य संपादक : किशोर केणी   |   सहसंपादक : दिनेश चांगू मोरे   |   सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 पश्चिम बंगालमधील गोळीबार आणि बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह तिघांना मुंबई गुन्हे शाखेकडून अटक.! 🚨

लोणेरे येथील निर्घृण हत्याकांडातील मुख्य सूत्रधार अखेर जेरबंद!
रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मुंब्र्यात धाडसी कारवाई

रोहा-रायगड, दि. २६ (प्रतिनिधी) :- ​रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील ओमकार लॉजमध्ये घडलेल्या एका भीषण आणि खळबळजनक हत्याकांडाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (LCB) मोठे यश आले आहे. १९ एप्रिल २०२६ रोजी गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओमकार लॉजमधील रूम नंबर ०१ मध्ये अनिस मोहम्मदखान मालदार या ३८ वर्षीय आरोपीने एका महिलेच्या डोक्यात आणि हाताच्या मनगटावर कोयत्याने भीषण वार करून तिची निर्घृण हत्या केली होती. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता, ज्याचा शोध घेण्यासाठी रायगडच्या पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. अभिजीत शिवथरे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम आखण्यात आली होती.

या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आपल्या अनुभवी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे एक मजबूत तपास पथक तैनात केले होते. या विशेष मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील व भास्कर जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद पाटील, सहाय्यक फौजदार संदीप पाटील, तसेच पोलीस हवालदार सुधीर मोरे, रवींद्र मुंडे, प्रतीक सावंत, शरद फरांदे, रंजित खराडे, अक्षय पाटील, रुपेश निगडे, सचिन वावेकर, प्रशांत लोहार, तुषार घरत आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप खरात व अक्षय जगताप या सर्वांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या जाळ्याचा वापर करून आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली.

​तपासादरम्यान पोलिसांना आरोपीच्या गुन्हेगारी इतिहासाची माहिती मिळाली, ज्यानुसार आरोपी अनिस मालदार याच्यावर २०२१ मध्ये मुंब्रा पोलीस ठाण्यात खुनाचा आणि अपहरणाचा गुन्हा आधीच दाखल असल्याचे समोर आले. तो अत्यंत सराईत गुन्हेगार असल्याने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी सतत आपली ठिकाणे बदलत होता. अखेर ठाणे आणि मुंब्रा परिसरात तो वावरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच, मुंब्रा येथील एका डॉरमेंटरी रूममधून आरोपीला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. पकडलेल्या आरोपीला पोलीस कोठडीसाठी न्यायालयात हजर करण्यात आले असून, महाड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. शंकर काळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Comments

Popular posts from this blog