लोणेरेतील मटका व जुगार कायमस्वरूपी बंद करण्याची महिला व ग्रामस्थांची मागणी! माणगांव (पदमाकर उभारे) : माणगांव तालुक्यातील मुंबई-गोवा हायवे लगत लोणेरे हे एक छोटेसे शहर असून या लोणेरे गावामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ असून या गावाचे नाव सर्वत्र राज्यात व देशात प्रसिद्ध आहे. तसेच देशभरातून या विद्यापीठात विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी येत असतात अशा या परिसरात भरदिवसा मटका, क्लब, जुगार व व्हिडीयो गेम पार्लर, लॉटरी हे अनाधिकृत धंदे चालू असून हे धंदे गोरेगाव पोलीसांनी कायमस्वरूपी बंद करावे अन्यथा लोणेरे ग्रामस्थ व महिला रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा माणगांव तहसीलदार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी माणगांव यांना लेखी निवेदन देतेवेळी महिला वर्गाने बोलताना सांगितले. यावेळी शंकुतला टेंबे माजी पं. स. सभापती माणगांव, विठाबाई टेंबे, मोहीनी टेंबे, भारती टेंबे, अनिता टेंबे, नंदा टेंबे, नकुशा टेंबे, मंदा टेंबे, मनिषा टेंबे, संगीता टेंबे, सुरेखा टेंबे, सुनिता टेंबे या महिला वर्गानी पुढे बोलताना असे सांगितले की लोणेरे हे एक छोटेसे शहार असून येथे मटका, क्लब, जुगार...
मुख्य संपादक : किशोर केणी |
सहसंपादक : दिनेश चांगू मोरे |
सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज

Comments
Post a Comment